पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा तेविसावा हप्ता शनिवारी (ता. २०) शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे होणाऱ्या एका शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ अशा चारमाही हप्त्याचे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट वितरण होणार आहे.

त्यानिमित्ताने केंद्र शासनाने २० जून हा दिवस देशभर ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर उपलब्ध होईल. तसेच शेतकऱ्यांना गावातील नागरी सुविधा केंद्रांवरूनही (सीएससी) प्रक्षेपण बघता येईल.

योजनेतील पारदर्शकता वाढवणे, संभाव्य गळती रोखणे आणि केवळ पात्र व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच लाभ पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार २० मे २०२६ पासून राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळख) या दोन सोप्या पद्धती उपलब्ध आहेत. वृद्ध, आजारी किंवा हालचालींमध्ये अडचण असलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे.

ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी पूर्ण करून देणार आहेत.कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यांनी सांगितले, की राज्यात आधार संलग्नता व ई-केवायसी प्रमाणीकरण या अटी पूर्ण केलेल्या ९०.८५ लाख शेतकऱ्यांना १८१७ कोटी वितरीत केले जाणार आहे.निधी जमा होतील. कृषीसह महसूल व ग्रामविकास विभागाने संयुक्तपणे हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी राज्यातील विविध कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समित्या, शेतकरी उत्पादक कंपन्या व प्राथमिक कृषी पतपुरवठा सोसायट्यांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/pm-kisan-23rd-installment-credit-to-farmers-bank-accounts-june-20-rat16

माहिती शेअर करा