‘नाबार्ड’च्या (राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक) पुढाकारामुळे शेती व ग्रामीण भागाशी संबंधित देशातील १७६ उत्पादनांना आतापर्यंत भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. यामुळे शेतकरी, कारागीर, शेतकरी गट आणि अन्य उत्पादकांसाठी व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून, १३ हजारांहून अधिक उत्पादक थेट बाजारपेठांशी जोडले जाणार आहेत.
ग्रामीण व कृषिसमृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि उत्पादकांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘नाबार्ड’ने देशभर जीआय नोंदणीसाठी मोहीम राबविली आहे. यात हस्तकला, हातमाग वस्त्रे, बांबू हस्तकला, धातुकाम, मातीची भांडी, चित्रकला आणि वाद्यनिर्मितीशी संबंधित उत्पादनांचा समावेश आहे.‘जीआय’ मानांकनामुळे या उत्पादनांना प्रदेशविशिष्ट ओळखीसह कायदेशीर संरक्षण मिळणार असून, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संधी वाढतील, असे ‘नाबार्ड’ने म्हटले आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/nabard-gi-tag-176-agricultural-rural-products-india-rat16