राज्य सरकारने ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गावातील वापरात नसलेली पडून असलेली सरकारी पडीक जमीन महिलांच्या उपजीविकेसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेसाठी नोंदणीकृत महिला बचत गट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांचे बचत गट आणि उमेद/माविम अंतर्गतचे ग्रामसंघ अर्ज करू शकतात.
या योजनेत, जमिनीचे वाटप संबंधित गटाच्या सदस्यसंख्या आणि पात्रतेनुसार करण्यात येईल. गटाच्या सदस्यसंख्येनुसार जमिनीचे वाटप करण्यात येणार असून, १० सदस्यांच्या बचत गटाला १ हेक्टर, २० सदस्यांच्या संस्था किंवा बचत गटाला २ हेक्टर, तर ग्रामसंघाला कमाल ५ हेक्टरपर्यंत जमीन मिळणार आहे.
तसेच, या जमिनींचा योग्य वापर झाल्याने शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे आणि वाद कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय महिलांना रोजगार व उत्पन्नाचे साधन मिळेल, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास आणि समाजात त्यांचे स्थान अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/rajmata-jijau-women-empowerment-government-land-scheme-rat16