पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी ३८ हजार ३९० शेतकऱ्यांची ४१ हजार ४२१ कर्ज खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीतील पात्र लाभार्थी यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांकासह आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच या योजनेच्या लाभाची रक्कम त्यांच्या बॅंक खाती जमा होणार आहे.
कर्जमाफीच्या लाभासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र किंवा बँक शाखेमध्ये ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांकासह जाऊन आधार क्रमांकाची, कर्ज खात्याची व माहितीची पडताळणी करून आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार आहे.
शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये विसंगती असल्यास पडताळणी केंद्रावरच तशी पोर्टलवर विसंगतीबाबत नोंद करणे आवश्यक आहे. ही विसंगती दुरुस्ती करून झाल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेंतर्गत विकास सेवा सोसायटींची सुमारे ३८ हजार ३९० सभासदांची एकूण ४१ हजार ४२१ कर्ज खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत.
https://agrowon.esakal.com/agro-special/41000-loan-accounts-uploaded-for-farm-loan-waiver