भारत, पाकिस्तान, बांगलादेश या दक्षिण आशियायी देशांत गेले दोन-तीन महिने तापमान सतत वाढत आहे. भारतासकट या सर्व गरीब देशांमध्ये हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी लोकांचे प्रमाण खूप मोठे आहे. यातील बहुसंख्य लोक उघड्यावर काम करतात. त्यामुळे त्यांना प्रखर उन्हात काम करावे लागते. आजारी पडू या भीतीने कामावर गेले नाही तर त्यांची त्या दिवसाची चूल पेटत नाही.

आपल्या देशात देखील उष्णतेमुळे मरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण मृत्यू झाल्यावर तत्कालीन वेगळ्याच कारणाने मृत्यू झाल्याची नोंद केली जाते. त्यामुळे उष्माघाताचे गांभीर्य आकडेवारीत पकडले जात नाही.एवढेच नाही युरोपियन देशांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. ब्रिटन, फ्रान्स मध्ये अनेक ठिकाणी तापमान ऐतिहासिक उंचीवर पोहोचत आहे. शाळांना सुट्ट्या दिल्या गेल्या आहेत. १२ देशांनी नागरिकांना इशारे जारी केलेले आहेत.

धोरणकर्त्यांना या वर्षी ‘एल निनो’ची पंचिंग बॅग मिळाली आहे. सारे बिल अल निनो वर फाडले जात आहे. पण वातावरणातील बदलामुळे उन्हाळ्यातील तापमान, पावसाळयात अतिवृष्टी, हिवाळ्यात शून्याखाली तापमान आणि हिमवृष्टी, वणवे इ. घटनांची तीव्रता आणि वारंवारिता दरवर्षी वाढत आहे. गेली काही वर्षे पृथ्वीच्या विविध भूभागावर घडणाऱ्या टोकाच्या वातावरणीय बदलाच्या घटना एकत्र बघितल्या तर त्यातून तयार होणारा पॅटर्न कळेल. त्याचे गांभीर्य कळेल.

https://agrowon.esakal.com/agro-special/climate-change-growing-global-challenge-rat16

माहिती शेअर करा