महिला शेतकऱ्यांना ‘स्वतंत्र शेतकरी’ म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणलेले ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक-२०२६’ मंगळवारी (ता.७) रात्री विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकावर साडेतीन तास सविस्तर चर्चा झाली.
या विधेयकाला राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर शेतकरी महिलांसाठी स्वतंत्र कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे ऐतिहासिक पाऊल असून, महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्राने महत्त्वाचा निर्णय घेतल्याचा विश्वास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. दरम्यान, विधेयकावरील चर्चेदरम्यान बहुतांश सदस्यांनी महिलांना केवळ शेतकरी म्हणून दर्जा देणे पुरेसे नसून, त्यांना शेतीत समान हक्क आणि मालकीही मिळाली तरच या विधेयकाचा खरा उद्देश साध्य होईल, असे मत व्यक्त केले.
https://agrowon.esakal.com/agro-special/women-farmers-empowerment-bill-maharashtra-approved-rat16