‘‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या माध्यमातून महिलांची फसवणूक करू नका. जोवर महिलांच्या नावावर शेती होत नाही, सात-बारावर नावे नोंद होत नाहीत, तोवर या विधेयकाला अर्थ नाही. या विधेयकात वित्तपुरवठा करणे प्रस्तावित आहे. सरकारने दिलेले प्रमाणपत्र घेऊन गेल्यावर कर्ज मिळणार का? शेतकरी प्रमाणपत्राने महिलांच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे?,’’ अशा प्रश्नांची सरबत्ती विरोधी पक्षांसह सत्ताधारी सदस्यांनीही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर या विधेयकावरील चर्चेदरम्यान केली.

गुरुवारी (ता. २) दीर्घ चर्चेअंती विधानसभेत महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक २०२६ विधेयक एकमताने संमत करण्यात आले. विधानसभेत हे विधेयक मांडताना भरणे यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे विधेयक महत्त्वाचे असल्याचा दावा केला. सत्ताधारी बाकावरून सर्वच महिला मंत्री, महिला सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दर्शविला.विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांनी केलेल्या सूचनांवर स्पष्टीकरण देताना या माध्यमातून महिलांना शेतकरी ही ओळख निर्माण करून दिली जाईल. या विधेयकाच्या माध्यमातून शेतीची व्याख्या व्यापक केली आहे, असेही ते म्हणाले.

https://agrowon.esakal.com/agro-special/maharashtra-women-farmers-empowerment-bill-approved-abhi47

माहिती शेअर करा