राज्यात पावसाला पोषक झाल्याने काही भागात पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. तर काही भागांत कमाल तापमानाचा पारा ३७ च्या पार पोहचल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. तसेच ऊन-सावल्यांचा खेळही अनुभवायला मिळत आहे. 

आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठावाड्यातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची इशारा देण्यात आला आहे. तर राज्याच्या उर्वरित भागांत मात्र ऊन सावल्यांच्या खेळ सुरु राहून उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

आज नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, ठाणे, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, पालघर, मुंबई, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे.

तर उद्या म्हणजेच गुरुवारी सातारा घाटमाथा, सातारा, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, अहिल्यानगर, सांगली, नाशिक, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात मात्र उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

https://agrowon.esakal.com/weather-news/maharashtra-rain-update-yellow-alert-konkan-marathwada-vidarbha-abhi47-2

माहिती शेअर करा