इराणने भारतीय तेल टँकर जहाजांना होर्मूझ सामुद्रधुनीतून जाण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु अमेरिका, युरोप आणि इस्राईलशी संबंधित जहाजांना या जलमार्गातून जाण्यास निर्बंध आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्यातील चर्चेनंतर इराणने गुरुवारी (ता. १२) भारतीय तेल टँकरना होर्मूझ सामुद्रधुनीतून जाण्याचा मार्ग मोकळा केला.

यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला. ही सामुद्रधुनी कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सध्या सुरू असलेल्या इस्राईल-इराण युद्धामुळे तेल, गॅस वाहतूक ठप्प झाली. या पार्श्वभूमीवर भारताने इंधन आयातीसाठी सुरक्षित मार्ग निश्चित करण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत.अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे होर्मूझच्या सामुद्रधुनी भागात अस्थिरतेचे वातावरण आहे. परिणामी, भारतात व्यावसायिक एलपीजीची टंचाई निर्माण झाली. यामुळे हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली.

अमेरिका-इस्राईलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर महत्त्वाच्या होर्मूझच्या सामुद्रधुनी जलमार्गातून वाहतूक थांबली होती. पण इराणने गुरुवारी (ता. १२) भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना होर्मूझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्यास परवानगी दिल्याचे वृत्त द इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना जाण्यासाठी परवानगी दिली असली, तरी इराणने इशारा दिला आहे, की होर्मूझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना त्यांची परवानगी घ्यावीच लागेल, अन्यथा हल्ला होऊ होऊ शकतो.

https://agrowon.esakal.com/agro-special/iran-allows-indian-oil-tankers-through-strait-of-hormuz-sai29

माहिती शेअर करा