पुणे-मुंबई दरम्यानची भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन नेरळवरून थेट नाशिक आणि अहिल्यानगर मार्गला जोडणाऱ्या नेरळ-शिरूर या चारपदरी महामार्गाच्या बांधकामाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातून आणखी एका नवा महामार्ग तयार होणार असून, मुंबईहून थेट अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी एक नवा पर्यायी मार्ग तयार होणार आहे.

१२०० कोटींचा प्रकल्प

राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने गेल्या मार्चमध्ये नव्या मार्गाला मंजुरी दिली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी रस्त्याच्या भूसंपादनासाठी १२०० कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली असून, हा रस्ता खासगीकरणाच्या माध्यमातून (टोल रोड) विकसित करण्यास मंजुरी 

https://agrowon.esakal.com/agro-special/ethanol-petrol-e25-blending-india-policy-2025-abhi47

माहिती शेअर करा