यंदाच्या (२०२६) खरीप हंगामात बुधवार (ता. २९) सकाळपर्यंत पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील ३ लाख ४१ हजार २०८ शेतकऱ्यांनी ५ लाख २० हजार ८९२ पीकविमा अर्ज दाखल केले आहेत.या शेतकऱ्यांनी स्वहिश्श्यापोटी ३८ कोटी ४८ लाख ४ हजार रुपये विमा हप्ता भरला असून, ४ लाख ४२ हजार ७२० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग आणि उडीद पिकांसाठी २ हजार १२९ कोटी ६१ लाख ७६ हजार रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे. पीकविमा अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवार (ता. ३१) आहे. खरीप पीकविमा योजना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील कपाशी, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पिकांसाठी लागू आहे.
परभणी जिल्ह्यात बुधवार (ता. २९) सकाळपर्यंत जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांतील १ लाख ७० हजार ९१८ शेतकऱ्यांनी ३ लाख २३ हजार २५० विमा अर्ज दाखल केले. त्यापैकी कर्जदारांचे ६ हजार १९८ आणि बिगर कर्जदारांचे ३ लाख १७ हजार ५२ अर्ज आहेत. या शेतकऱ्यांनी २३ कोटी ८७ लाख ५४ हजार रुपये स्वहिश्श्याचा विमा हप्ता भरला असून, २ लाख १८ हजार ९७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी १ हजार ३५२ कोटी ९७ लाख ५५ हजार रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/over-5-lakh-crop-insurance-applications-filed