कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरी पडत आहेत. तर मराठवाडा आणि विदर्भातसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी आहे. पुढील ५ दिवस राज्यातील काही जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मागील काही दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. मात्र राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. बहुतांशी भागात जोरदार पावसाचा अभाव आहे. तसेच पावसाचे वितरणही असमान आहे.
राज्यातील काही भागात आजपासून पुढील ४ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज कोकणातील सर्वच जिल्हे तसेच नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील इतर भाग तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
https://agrowon.esakal.com/weather-news/vidarbha-rain-forecast-konkan-ghatmatha-maharashtra-abhi47