देशातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने भारत-विस्तार हा एआय-आधारित डिजिटल साथीदार प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. या आधुनिक सुविधेमुळे शेतकऱ्यांना कीड व रोग व्यवस्थापन, मातीचे आरोग्य, पीक सल्ला तसेच विविध सरकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.
भारत-विस्तार हे व्हॉइस-फर्स्ट म्हणजेच आवाजाच्या माध्यमातून वापरता येणारे आणि बहुभाषिक तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. देशातील शेतकऱ्याला त्याच्या स्थानिक भाषेत आणि गरजेनुसार अचूक मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
प्लॅटफॉर्मची प्रमुख उद्दिष्टे
- शेतीशी संबंधित सर्व विश्वसनीय आणि अद्ययावत माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणे.
- कृषी सल्ला, हवामान अंदाज, बाजारभाव (मंडी भाव), कीड-रोग व्यवस्थापन आणि मातीचे आरोग्य यांसारख्या विषयांवर एआयच्या माध्यमातून अचूक सल्ला देणे.
- केंद्र सरकारच्या विविध कृषी योजनांची माहिती आणि त्यांच्या सेवा शेतकऱ्यांपर्यंत सहज पोहोचवणे.
- स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांनाही साध्या मोबाईल कॉलद्वारे या सेवेचा लाभ घेता यावा, हा यामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/bharat-vistaar-ai-digital-agriculture-platform-farmers-rat16