राज्यात पावसाने ओढ दिली असली तरी काही ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. तर अनेक भागात उन्हाचा चटकाही जाणवू लागला आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज असून बहुतांश ठिकाणी उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. 

आज म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांसह पावसाच्या हलक्या सरी शक्य आहेत. तर उर्वरित राज्यात ऊन सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. परंतु मॉन्सूनचा प्रवाह कमकुवत झाल्याने सर्वदूर पावसाची कमीच आहे. 

हवामानशास्त्र विभागाने चार दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. पुढील चारही दिवस पावसाची शक्यता बहुतांश कमीच आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांसह तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. तर बहुतांश भागात ऊन सावल्यांचा खेळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

https://agrowon.esakal.com/weather-news/maharashtra-weather-forecast-light-showers-central-maharashtra-marathwada-rat16

माहिती शेअर करा