शेतकऱ्यांना अचूक हवामानाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी (ता. ३१) सामंजस्य करार केला. या करारानुसार नाबार्ड आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या UNDP सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या DiCRA या डिजिटल व्यासपीठावर हवामानविषयक माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

करार नेमका कशासाठी?

देशभरातील शेतकरी, बँका व वित्तसंस्था, धोरणकर्ते तसेच अभ्यासक-संशोधक यांना हवामानाची माहिती विनामूल्य आणि सहज उपलब्ध करून देणे, हे या कराराचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी आयएमडी हवामान अंदाज, कृषीविषयक हवामान सल्ला, धोक्याचे इशारे आणि प्रत्यक्ष निरीक्षणाधारित नोंदी DiCRA पोर्टलला पुरवेल. त्यानंतर या माहितीचा प्रसार नाबार्ड आपल्या वेब पोर्टल, मोबाइल ॲप आणि खुल्या एपीआय सुविधेमार्फत देशभरातील शेतकरी व इतर वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवणार आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/nabard-imd-mou-accurate-weather-information-farmers-rat16

माहिती शेअर करा