नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीचा प्रवास हळूहळू सुरूच आहे. सोमवारी (ता. २१) राजस्थानच्या आणखी काही भागासह पंजाब, हरियानाच्या काही भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. दोन दिवसांत वायव्य भारताच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे.शनिवारी (ता. १४) मॉन्सूनने पश्चिम राजस्थानमधून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मॉन्सूनने यंदा दोन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू केला आहे.
९ जुलै रोजी देश व्यापलेल्या मॉन्सूनने यंदा तब्बल २ महिने १० दिवसांनी देशातून मुक्काम हलविला. त्यानंतर सोमवारी (ता. २१) मॉन्सूनने आणखी काही भागांतून माघार घेतली आहे.जैसलमेर, नागौर, सिकार, रोहतक, पटियाला, गुरदासपूर पर्यंतच्या भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
परतीस पोषक हवामान असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण पंजाब, हरियाना, चंडीगडस दिल्लीसह, राजस्थानचा आणखी काही भाग, सौराष्ट्र, कच्छचा काही भाग, जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशाच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
https://agrowon.esakal.com/weather-news/monsoon-withdrawal-rajasthan-punjab-haryana-2026-rat16