राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने काही भागात पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. तर काही भागात पावसची प्रतीक्षा कायम आहे. उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. आज म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
आज चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच जालना, परभणी, नांदेड, हिंगोलीसह जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथ्यावर विजांसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
तर लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळत हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.तर उद्या म्हणजेच शनिवारी पालघर, नाशिक घाटमाथा, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, ठाणे, पुणे घाटमाथा, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, बुलढाणा, अकोला, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.