ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात चक्रीवादळे आलीच तर खरीप काढणीला आलेल्या तसेच रब्बी पेरणी, वाढीच्या अवस्थेतील पिकांचे नुकसान वाढणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.मागील एक-दीड दशकभराच्या काळातील फयान, निसर्ग, तौक्ते, बिपरजॉय, शक्ती या चक्रीवादळांचा भारतातील समुद्रतटी प्रदेशांना बसलेल्या तडाख्यांच्या आठवणीने देखील अंगावर काटा येतो. त्यातच आता ‘इस्त्रो’ने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) मॉन्सनोत्तर हंगामात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तीन मोठी चक्रीवादळे तयार होणार असल्याचा इशारा दिला आहे. गेल्या ४४ वर्षांत आलेल्या चक्रीवादळांपेक्षा मोठा तडाखा या वादळांनी बसणार असल्याची शक्यताही या संस्थेने वर्तविली आहे.

त्यामुळे यात होणाऱ्या जीवित वित्त हानीचा अंदाज आपल्याला यायला हवा. यावर्षीच्या खरिपावर एल निनो चे सावट आहे. कमी पाऊसमानामुळे महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यातच २०२६-२७ च्या म्हणजे आगामी हिवाळ्यात एल निनो अतितीव्र स्वरूप धारण करणार असल्याचे अमेरिकेच्या ‘नॅशनल ओशनिक ॲंड ॲटमॉसफेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’च्या (नोआ) क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

अतितीव्र एल निनो मुळे परतीच्या पावसावर असलेल्या आशाही मावळल्या आहेत. यंदाच्या कमी पाऊसमान, दुष्काळात पिके कशीबशी वाचली तरी पुढे चक्रीवादळांमुळे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात चक्रीवादळे आलीच तर खरीप काढणीला आलेल्या तसेच रब्बी पेरणी, वाढीच्या अवस्थेतील पिकांचे नुकसान वाढणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

https://agrowon.esakal.com/sampadkiya/cyclone-threat-kharif-harvesting-rabi-crops-abhi47

माहिती शेअर करा