राज्यातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टरच्या पॉवर टिलरसारख्या आधुनिक शेती अवजारांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना १.२० हजारांपर्यंत अनुदान मिळत आहे. यात अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना ५० टक्के, तर इतर शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान दिले जाते.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती यंत्रसामग्री खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण असते, कारण त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र, कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजनेमुळे त्यांना शेती अवजारे खरेदीसाठी आवश्यक ती आर्थिक मदत उपलब्ध होते. त्यामुळे शेतातील कामे लवकर आणि सोप्या पद्धतीने पूर्ण करता येतात.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रे उपलब्ध करून देणे आणि त्याद्वारे उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांना जास्त नफा मिळवून देणे हा आहे. तसेच, या योजनेअंतर्गत यंत्रसामग्री खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जाते आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन दिले जाते.

https://agrowon.esakal.com/agro-special/farmers-will-get-subsidy-of-up-to-rs-120-lakh-for-purchasing-power-tiller-state-governments-scheme-rat16

माहिती शेअर करा