पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार २०२६-२७ साठी द्राक्ष, मोसंबी, केळी, पपई, नारळ, संत्रा, अंजीर, आंबा आणि डाळिंब या फळपिकांसाठी शेतकऱ्यांनी विहित मुदतीत विमा अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालकांनी केले आहे. पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.

फळपिकानुसार विमा अर्ज करण्याची अंतिम मुदत वेगवेगळी आहे. द्राक्षासाठी १५ ऑक्टोबर, केळी, मोसंबी, पपई आणि नारळासाठी ३१ ऑक्टोबर, संत्रा व अंजीरसाठी ३० नोव्हेंबर, आंब्यासाठी ३१ डिसेंबर २०२६, तर डाळिंबासाठी १४ जानेवारी २०२७ ही अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर (https://www.pmfby.gov.in) अर्ज करावेत.

कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. गारपीट या हवामान धोक्यासाठी विमा संरक्षण घेणेही ऐच्छिक असून, त्यासाठी अतिरिक्त विमा हप्ता भरावा लागेल. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे आहे की नाही, याबाबतचे घोषणापत्र अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी सादर करणे आवश्यक आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/fruit-crop-insurance-scheme-ambia-bahar-2026-27-rat16

माहिती शेअर करा