भारताचा विकासदर २०२६मध्ये ६.४ टक्के राहील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे. याआधी, विकासदर ६.६ टक्के राहील, असे सांगण्यात आले होते. मात्र जागतिक अस्थिरता आणि पश्चिम आशियातील परिस्थिती निर्माण झालेल्या आर्थिक धक्क्यांमुळे या अंदाजात सुधारणा करण्यात आली आहे. मात्र, विकासदरामध्ये घट होणार असली, तरीही भारत हीच जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असेही नमूद केले आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर २.५ टक्के राहणार असून, जानेवारीमध्ये नमूद केलेल्या अंदाजापेक्षा हा दर ०.२ टक्क्यांनी कमी असेल. तसेच, कोरोना महासाथीपूर्वीच्या स्थितीपेक्षा तो खूपच कमी राहण्याची आहे.या विभागातील वरिष्ठ अर्थतज्ज्ञ इंगो पीटल म्हणाले, ‘‘सध्याच्या जागतिक समस्यांपासून भाजप दूर राहू शकत नाही. भारत मोठ्या प्रमाणात इंधनाची आयात करत असतो. याशिवाय, परदेशातील भारतीयांकडून पाठविण्यात येणाऱ्या पैशांवरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. जगभरातील वित्तीय नियंत्रण वाढल्यामुळे वित्तधोरण अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.

https://agrowon.esakal.com/agro-special/india-growth-rate-64-percent-rat16

माहिती शेअर करा