पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत गुरुवारी (ता. १) ३ लाख २७ हजार शेतकऱ्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली.या अंतर्गत ३ हजार १६१ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली. तर आतापर्यंत १५ लाख ८६ हजार शेतकऱ्यांना १३ हजार २७६ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे.
राज्य सरकारने २ जून २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. यानंतर काही निकषांमध्ये दुरुस्ती करत प्रत्यक्ष कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू केली.तीन टप्प्यांमध्ये आतापर्यंत १५ लाख ८६ हजार शेतकऱ्यांना १३ हजार २७६ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे.
गेल्या तीन टप्प्यांतील विभागनिहाय शेतकरी संख्या आणि कर्जमाफी रक्कम
विभाग शेतकरी संख्या रक्कम
छत्रपती संभाजीनगर ६ लाख २७ हजार ५ हजार १२४
अमरावती ३ लाख ६५ हजार ३ हजार २१०
नागपूर १ लाख ४१ हजार १ हजार १३७
नाशिक २ लाख ४८ हजार २ हजार १७४
पुणे १ लाख ७२ हजार १ हजार ४४३
कोकण ३१ हजार १८८