राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्यानंतर गुरुवारी (ता.१) रात्री पुन्हा १९ तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. वास्तविक, दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४३ तालुक्यांचा समावेश करण्यात येईल, असे सांगितले होते.
दरम्यान, खासदार अशोक चव्हाण, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. दुष्काळाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर मंत्री, तसेच सत्ताधारी आमदारांनी आक्षेप घेत आणखी तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर आणखी १९ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यांतील प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण, ग्राउंड ट्रुथिंग करून अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावेत, असे निर्देशही उपसमितीने दिले आहेत.
https://agrowon.esakal.com/agro-special/maharashtra-drought-19-more-talukas-declared-rat16