शेतीची माहिती देणारे गुगलचे जे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल्स प्रथम भारतासाठी तयार करण्यात आले, ते आता इतर देशांतही वापरले जात आहेत. सुरुवातीला भारतातील शेतजमिनीची माहिती नोंदविणारे हे मॉडेल्स गेल्या वर्षी आशिया-प्रशांत भागातील देशांत नेण्यात आले आणि अलीकडेच केनिया, युगांडा, घाना, रवांडा, नायजेरिया व झांबिया या सहा आफ्रिकी देशांची शेतीविषयक माहिती देऊ लागले आहेत, असे गुगलच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

गुगल डीपमाइंडमधील कृषी व शाश्वतता संशोधन विभागाचे प्रमुख आलोक तळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या अँथ्रोकृषी गटाने ही दोन मॉडेल विकसित केली आहेत. त्यातील अॅग्रिकल्चरल लँडस्केप अंडरस्टँडिंग (ALU) हे शेताच्या पातळीवर जमिनीची माहिती देते, तर अॅग्रिकल्चरल मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिटेक्शन (AMED) हे शेतात होणारे बदल व घडामोडी टिपते.

https://agrowon.esakal.com/agro-special/india-agriculture-ai-models-africa-rat16

माहिती शेअर करा