प्रशांत महासागरात विकसित होत असलेली ‘एल निनो’ची स्थिती अभूतपूर्व तीव्र होण्याची शक्यता जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) व्यक्त केली आहे.नोव्हेंबर २०२६ ते जानेवारी २०२७ या काळात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा ३.८ अंश सेल्सिअसपर्यंत अधिक राहू शकते. डिसेंबरमध्ये या स्थितीचा कळस गाठला जाण्याची शक्यता असून, जगभरातील तापमान आणि पावसावर त्याचा परिणाम होऊ शकतो. भारतासह दक्षिण आणि आग्नेय आशियात नेहमीपेक्षा अधिक उष्णता वाढणार असून, पावसाची शक्यताही कमी आहे.
‘एल निनो’ ही ‘एल निनो सदर्न ऑसिलेशन’मधील (ईएनएसओ) तीन टप्प्यांपैकी एक स्थिती आहे. मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या तापमानातील बदल आणि त्यावरील वातावरणातील चढ-उतार हे या हवामानविषयक बदलांचे वैशिष्ट्य आहे.
भारतावर परिणाम काय?
- भारतासह दक्षिण आशियातील बहुतांश भागांत कमाल आणि किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे.
- ऑक्टोबर ते डिसेंबर हा दक्षिण भारतासाठी महत्त्वाचा पावसाचा काळ आहे. या काळात होणारा ईशान्य मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्याचा शेतीच्या कामांवर परिणाम होऊ शकतो.
https://agrowon.esakal.com/agro-special/super-el-nino-2026-wmo-unprecedented-weather-forecast-rat16