परभणी यावर्षीच्या (२०२६) खरीप हंगामात सोमवार (ता. २४) पर्यंत परभणी जिल्ह्यातील डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे ४५ हजार १५४ शेतकरी खातेदारांच्या (प्लॉट) पीक पेऱ्यांची नोंद घेण्यात आली आहे. या अंतर्गंत जिल्ह्यात पीक पाहणीचे सरासरी ०.७२ टक्के काम पूर्ण झाले आहे.

परभणी जिल्ह्यातील एकूण शेतकरी खातेदारांची संख्या ( प्लॉट) ७ लाख ६४ हजार ७१६ आहे.त्यापैकी डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे पीक पाहणीसाठी ६ लाख ८९ हजार ४४२ प्लॉट आहेत. सोमवार (ता. २४) पर्यंत ४५ हजार १५४ शेतकरी खातेदारांच्या पीक पेऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी ४ हजार १११ शेतकऱ्यांच्या पीक पेरा नोंदीला मंजुरी देण्यात आली तर ४० हजार ६२३ प्लॉटची मंजुरी प्रलंबित आहे. ४३० नोंदी नाकारण्यात आल्या आहेत.

https://agrowon.esakal.com/agro-special/digital-farming-milestone-over-45000-farmers-register-crop-details-via-mobile-app-aak11

माहिती शेअर करा