वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने राज्य शासनाने महाडीबीटीच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्राणी प्रतिबंधक जैवध्वनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे.या योजनेंतर्गत सौर पॅनेलसह प्राणी प्रतिबंधक जैवध्वनिक उपकरण खरेदीसाठी ३५ हजार रुपयांपर्यंत, तर विद्युतचालित उपकरणासाठी २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचा शेतात प्रवेश होऊन उभ्या पिकांचे, फळपिकांचे व उत्पादनाचे नुकसान होत असल्याने ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणामुळे शेतात वीज नसली तरीही उपकरण वापरता येते, त्यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी हा पर्याय फायदेशीर ठरणार आहे.

यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरून आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यांनंतर अर्जाची निवड होते. अर्ज निवडीत आल्यानंतर पूर्वसंमती घेऊनच उपकरण खरेदी करावे लागते. तसेच खरेदीनंतर आवश्यक कागदपत्रे वेळेत अपलोड केल्यास अनुदान थेट शेतकऱ्याच्या आधार-लिंक बँक खात्यात जमा होते.

https://agrowon.esakal.com/agro-special/bio-acoustic-device-subsidy-maharashtra-crop-protection-scheme-rat16

माहिती शेअर करा