मृग बहर जिल्ह्यात डाळिंब, लिंबू, पेरू, सीताफळ आणि चिकू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविली जाणार आहे. ही योजना बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून राबवण्यात येणार असून सरकारच्या महावेध प्रकल्पांतर्गत हवामान केंद्रांवर नोंदविलेल्या माहितीनुसार सहभागी शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

या योजनेत डाळिंबासाठी किनगाव, अहमदपूर, खंडाळी, नागलगाव, हेर, औसा, लामजना, किनीथोट, किल्लारी, बेलकुंड, भादा, चाकूर, नळेगाव, वडवळ ना., निलंगा, औराद शहाजानी, कारेपूर, पानगाव, चिकूसाठी अहमदपूर, पेरुसाठी अहमदपूर, खंडाळी, शिरूर ताजबंद, हाडोळती, मातोळा, उजनी, बेलकुंड, लामजना, किल्लारी, घोणसी,जळकोट, मुरुड, लिंबूसाठी हेर, सीताफळासाठी शिरूर ताजबंद, उजनी, बेलकुंड, आष्टा, औराद शहाजानी, रेणापूर, पळशी, पोहरेगाव, पानगाव, कारेपूर, हरंगूळ बु., कन्हेरी, मुरुड बु. ही महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे.

कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेत घोषणापत्र आणि अर्ज सादर करावा. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी www.pmfby.gov.in वर ऑनलाइन नोंदणी करावी. अर्जासोबत आधार कार्ड, सातबारा, ८ (अ) उतारा, फळबागेचा जिओ टॅगींग फोटो, भाडेपट्टा करार (आवश्यक असल्यास), आणि बँक पासबुक प्रत सादर करणे बंधनकारक आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/latur-weather-based-fruit-crop-insurance-scheme-2026-abhi47

माहिती शेअर करा